अंबाजोगाई : रुग्णसंख्या कमी झाल्याने लोखंडी सावरगावच्या वृध्दत्व निवारण केंद्राच्या इमारतीतील कोविड सेंटर बंद करण्यात येणार आहे. स्त्री रुग्णालयाच्या इमारतीमधील कोविड सेंटर मात्र सुरू राहणार आहे. आरोग्य उपसंचालक डाॅ. एकनाथ माले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी येथे भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. नियोजनाबाबत सूचना केल्याचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.
लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व निवारण व मानसिक आजार उपचार केंद्र आणि स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड सेंटर सुरू होते. दरम्यान, आता कोविडचे रुग्ण कमी झाल्याने वृध्दत्व निवारणाच्या इमारतीतील कोविड केंद्रात उपचार घेत असलेले उर्वरित ३० रुग्ण हे बाजूच्या स्त्री रुग्णालयाच्या केंद्रात हलविण्यात येणार आहेत. सोमवारपासून या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. तसे नियोजन या बैठकीत झाले. या ठिकाणी १४ डाॅक्टर, १४ परिचारिका, दोन लिपिक, फार्मासिस्ट एक असा कर्मचारी स्टाफ आहे. त्यामुळे या ठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा. शस्त्रक्रियागृह सुरू करून दैनंदिन मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा कॅम्प घ्यावा, अशा सूचना डॉ. माले यांनी केल्या. त्यासाठी वाॅर्डबाॅयसह इतर स्टाफ भरण्याची मागणीही स्थानिक अधीक्षकांनी केली. लवकरच या केंद्राला रुग्णवाहिकाही उपलब्ध होणार आहे.
...
हातात झाडू घेऊन केली स्वच्छता
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह उपस्थित सर्व डाॅक्टर, परिचारिकांनी हातात झाडू व खराटे घेऊन इमारतीची स्वच्छता केली. यावेळी स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. अरुणा केंद्रे, डाॅ. गणेश जाधव, डाॅ. कौस्तुभ कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. याप्रसंगी परिचारिका कावळे, शेरखाने, सूर्यवंशी यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
190621\avinash mudegaonkar_img-20210617-wa0048_14.jpg
===Caption===
लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व निवारण केंद्राच्या इमारतीच्या परिसरात स्वच्छता करताना आरो्ग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, डॉ. सुरेश साबळे व कर्मचारी.