माजलगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील गोरगरीब रुग्णांची मोठी परवड सुरू होती. ही अडचण लक्षात घेऊन येथील ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. ३० बेडच्या शासकीय कोरोना रुग्णालयाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
खासगी रुग्णालयांमध्ये गरीब कोरोना रुग्णांची होणारी हेळसांड तसेच मोठ्या प्रमाणात होत असलेली बिले त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच रुग्ण गंभीर झाल्यास त्याला बीड किंवा अंबाजोगाई येथे नेल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु आता शासकीय कोविड हॉस्पिटल झाल्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रसूती विभागात हे हॉस्पिटल उभारले असून, या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर असलेले बेड तसेच चार डॉक्टर आणि नर्सेसचा पूरक स्टाफ असणार आहे. जम्बो सिलिंडरचीदेखील व्यवस्था येथे असणार आहे. हॉस्पिटलचे उद्घाटन माजी सभापती जयदत्त नरवडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आ. प्रकाश सोळंके ऑनलाईन उपस्थित होते. बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक- अध्यक्ष बाबूराव पोटभरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी मधुकर घुबडे तसेच डॉ. गजाजन रूद्रवार, डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले, डॉ. गजानन कुलकर्णी, डॉ. धनंजय थावरे, डॉ. विजय पवार, डॉ. पूजा देशमुख, डॉ. रोहिणी थावरे, डॉ. भाग्यश्री बजाज, डॉ. सुप्रिया निर्मळ, स्टाफ नर्स शितल नाडे, सीता शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
===Photopath===
120521\4145img_20210512_184118_14.jpg