शिरूर कासार : धाकटी अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर संस्थान परिसरात अनावश्यक गवत मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यामुळे विंचुकाट्याची भीती वाटत होती. ते काढून टाकण्यासाठी दहिवंडीच्या महिलांना महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत तब्बल चाळीस महिलांचा जथ्था संस्थानवर आला. श्रमदानाच्या घामाने सिध्देश्वराचा महाभिषेक करून आपला सेवाभाव रुजू केला.
विवेकानंद शास्त्री हे कीर्तनानिमित्त दहिवंडीला गेले होते. त्या वेळी त्यांनी संस्थानवर एक दिवस श्रमदान करून हे गवत काढण्याचे आवाहन केले. त्याला लागलीच प्रतिसाद देत जवळपास चाळीस महिलांनी विळे, खुरपे घेऊन हे गवत अगदी गाणे गात गात काढून टाकून संस्थान परिसर स्वच्छ केला. या सर्व महिलांचे शास्त्रीजींनी कौतुक केले. रामदास महाराज यांच्यासह नंदाबाई आघाव, सावित्रा कठाळे, तारामती आघाव, मंदाबाई कठाळे, गंगुबाई आघाव, इंदुबाई कठाळे, कांताबाई आघाव, हिराबाई कठाळे, भामाबाई आघाव ,सिता आघाव द्वारकाबाई आघाव, नीता आघाव आदी महिला श्रमदानात सहभागी झाल्या होत्या.
230921\img-20210904-wa0035.jpg
फोटो