- नितीन कांबळेकडा- बाळेवाडी गावामध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच मंगळवारी एसटी महामंडळाच्या लालपरीचे आगमन झाले. आमदार भीमराव धोंडे यांनी बाळेवाडी गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळत दळणवळणाचे प्रमुख साधन उपलब्ध करून दिले. बस गावात येताच ग्रामस्थांनी चालक, वाहक यांचे फेटा बांधून स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथे महामंडळाची बस येत नव्हती. यामुळे अनेक विद्यार्थी, आठवडी बाजार व इतर कामांसाठी बाहेर जाताना ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गावात बस सुरू करण्याची मागणी होती.ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन आष्टी आगार प्रमुखांनी कडा -बाळेवाडी- कडा अशी बस मंगळवारपासून नियमित सुरू केली आहे. बस गावात येताच ग्रामस्थांनी बस चालक आणि वाहक यांचा सत्कार केला.
यावेळी सरपंच बापू पठारे उपसरपंच बाप्पू काळे ,नवनाथ शेलार ,अशोक गावडे, राजू शेलार सर, काका आल्हाडे, सुदाम आल्हाडे, सतीश आल्हाडे, बापू काळे, नानाभाऊ आल्हाडे, सुरेश पठारे, सुनील पठारे, दादासाहेब लगड ,दत्तू सोनवणे, दादा बोंद्रे ,ऋषिकेश बोंद्रे ,बाळु लगड ,परसराम लगड ,सोन्याबापु बर्डे, जालिंदर आल्हाडे, हरिदास आल्हाडे, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.