बीड : विधवा महिलांसाठी एक योजना सुरू असल्याचे खोटे सांगून एका महिलेचे १ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १४ एप्रिलला शहरातील भाजी मंडई परिसरात घडली. रेहाना बालेखा पठाण (रा. पाण्याची टाकीजवळ पेठ बीड) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
या इसमाने, विधवा महिलांसाठी एक योजना सुरू झाली आहे. त्या योजनेचे अनेक लाभ असून, त्याचा फायदा आयुष्यभर होणार आहे. तर, दोन लाख रुपयेदेखील मिळणार असल्याचे सांगून रेहाना यांना अमिष दाखविले. त्यानंतर भामट्याने रेहाना यांना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने दाखविण्यासाठी द्या, असे सांगून सर्व दागिने काढून घेतले. ज्याची किंमत १ लाख रुपये इतकी होती. ते सर्व दागिने घेऊन त्याठिकाणावरून भामटा पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेहाना यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास सफौ गांधले करत आहेत.