शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मांजरा धरणाचे दरवाजे उघडण्यास उशीर, पाच गावांतील शेतात घुसले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 3:57 PM

नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत

ठळक मुद्देशेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडले

अंबाजोगाई : तालुक्यातील धनेगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरूनही लातूर पाटबंधारे विभागाने चार दिवस धरणाचे दरवाजे उघडले नाहीत. परिणामी क्षमतेपेक्षा धरणाची पाणीपातळी अधिक वाढल्याने बॅक वाॅटर पाच गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभ्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे. 

मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मी. एवढी आहे. परतीच्या पावसामुळे पाण्याची आवक चांगली होऊन २७ ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरून पाणीसाठा २२४ दलघमी झाला, तरीदेखील पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त साठ्याचा विसर्ग करणे आवश्यक होते. मात्र, लातूर पाटबंधारे विभागाने धरण भरून चार दिवस झाले तरी दरवाजे उघडलेच नाहीत. परिणामी पाणीपातळी ७ सेंमीने वाढून ६४२.४४ मी. झाल्याने बॅक वाॅटरचे पाणी सादोळा, भालगाव, सोनेसांगवी, सुर्डी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे शेतीचे आणि उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  या नुकसानीसाठी लातूर पाटबंधारे विभागाची हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची तक्रार आ. नमिता मुंदडा यांनी रविवारी जलसंपदामंत्र्यांकडे करत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.

कालव्याऐवजी दरवाजांद्वारे सोडले पाणी  दरम्यान, शेतात पाणी घुसत असल्याची ओरड होऊ लागताच सोमवारी सकाळी मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजांमधून सध्या ९.८९६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, कालव्यावाटे थोडे थोडे पाणी सोडायचे ठरले असताना चार दिवस उशीर करून नदीपात्राने पाणी सोडल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे दरवाजे बंद करून पाणी कालव्याद्वारे सोडण्यासाठी आ. नमिता मुंदडा सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्नशील होत्या.

 

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणBeedबीडFarmerशेतकरी