बीड : तीन वर्षांत तब्बल २७७ गर्भ पिशवीच्या शस्त्रक्रिया करणाºया केज येथील एका खासगी रूग्णालयाने उशिरा अहवाल पाठविला आहे. त्यामुळे हे रूग्णालय संशयाच्या भोवºयात सापडले आहे.शनिवारी केजच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिवसभर रूग्णालयात ठाण मांडून सर्व कागदपत्रे जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उशिरा अहवाल पाठविण्याची कारणे मात्र संबंधित डॉक्टरने वेगवेगळी दिली आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी याप्रकरणी डॉ. आय. व्ही शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नियुक्त केली. जिल्ह्यातील सर्वच रूग्णालयांकडून अहवाल मागविला. मात्र केज येथील डॉ. त्र्यंबक चाटे यांच्या प्रतिभा नर्सिंग होमचा अहवाल सर्वात उशिरा आला. विशेष म्हणजे याच रूग्णालयात सर्वाधिक २७७ शस्त्रक्रिया झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बीडच्या तिडके रूग्णालयाचा क्रमांक लागतो. या रूग्णालयांची चौकशी सुरू असून कागदपत्रे ताब्यात घेतली जात आहेत.>तीन वर्षांत सर्वाधिक शस्त्रक्रियाप्रतिभा नर्सींग होम - २७७, तिडके हॉस्पिटल - १९६,श्री भगवान हॉस्पिटल- १९३, घोळवे हॉस्पिटल - १८६, वीर हॉस्पिटल - १७९, श्री क्रिपाळू हॉस्पिटल - १६७, ओस्तवाल हॉस्पिटल - १५१, धूत हॉस्पिटल - १४५, कराड हॉस्पिटल -११०, योगेश्वरी मॅटर्निटी होम -१०१, धन्वंतरी हॉस्पिटल - ९९ज्या रूग्णालयांमध्ये गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्या आहेत, त्यांचा अहवाल घेऊन चौकशी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीपूर्वीच केजच्या एका रूग्णालयाचा अहवाल मिळाला होता. त्याच रूग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. अधीक्षकांमार्फत चौकशी सुरू झाली असून कागदपत्रे ताब्यात घेतली जात आहेत. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
सर्वाधिक गर्भ पिशव्या काढणाऱ्या केजच्या रूग्णालयाने पाठविला उशिरा अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:05 AM