पंचायत समिती येथे झालेल्या या कार्यक्रमात सभापती चंद्रकला नागरगोजे, उपसभापती प्रकाश कोकाटे, गटविकास अधिकारी राजेंद्र कांबळे, कृषी अधिकारी वाघमोडे उपस्थित होते. सभापती नागरगोजे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक कल्पना लंगोटे यांनी प्रास्ताविकात संस्था बांधणी, क्षमताबांधणी, आर्थिक साक्षरता, अर्थसहाय्य या विषयांवर माहिती दिली. गटविकास अधिकारी कांबळे यानी शाश्वत उपजीविका महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियान ५ जूनपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कृषी अधिकारी वाघमोडे यांनी पोखरा योजनेविषयी मार्गदर्शन केले. जयशिव जगधने, दिनेश जाधव व अमोल शिंदे यांनी डिजिटल साक्षरतेबाबत माहिती दिली. यावेळी सर्व समुदाय संसाधन व्यक्ती व महिला सदस्य, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
===Photopath===
150321\15bed_5_15032021_14.jpg
===Caption===
धारूर पंचायत समितीमध्ये महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास प्रारंभ झाला.