शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पूरग्रस्त बीडला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा थेट प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:40 AM

मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला

ठळक मुद्देपालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सराकरने दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही.

बीड - गुलाब चक्रीवादळाचा तडाखा मराठवाड्याला बसला असून बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. बीडमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावासाने झालं असून अनेक शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या शेतकऱ्यांना मदती दिली जाईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय. मात्र, अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यावरुन, पंकजा मुंडेंनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी करताना, मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.  

मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळी तालुक्यातील  गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर, गुरवारच्या पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. 

पालकमंत्री पूरग्रस्त जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला गेले आहेत, असे म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तसेच, राज्य सराकरने दरवेळी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. राज्य सरकार हे पालक आहे. तर, केंद्र सरकार ग्रँड पॅरेंन्टस, त्यामुळे ते त्यांची जबाबदारी ओळखतात. पण, पालकांनी त्यांची जबाबदारी पूर्ण करायला हवी, असे पंकजा यांनी म्हटले. 

बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्ह्यात येऊन गेले. पण मंत्र्यांनी राजकीय दौरे करतांना इथल्या शेतकऱ्यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारीच व्यक्त केली.

सरकारने खबरदारी घेऊन मदत करावी

जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेRainपाऊसMarathwadaमराठवाडाBeedबीडPankaja Mundeपंकजा मुंडे