धारूर : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व कै. सुंदरराव सोळंके जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे संयुक्त व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. राम शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा मुक्ती संग्रामातील थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ व माजी खासदार स्वा. रामराव आवरगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी हे महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करीत असल्याचे सांगितले. डॉ. नितीन कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.
----
या कार्यक्रमात पाटोदा येथील पीव्हीपी महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे प्रा. प्रशांत साबळे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम व धारूरचे योगदान, तसेच कै. सुंदरराव सोळंके यांचे धारूर व परिसरातील शैक्षणिक व सामाजिक आर्थिक विकासातील योगदान आणि स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार रामराव आवरगावकर यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामातील विशेष योगदान यावर प्रकाश टाकला.
170921\img-20210917-wa0122.jpg
धारूर महाविद्यालय मुक्तीसंग्राम दिन साजरा