शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मानवी आहारात रानभाज्या महत्त्वाच्या - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन ...

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मानवी आहारात रानभाज्यांचे मोठे महत्त्व आहे. निसर्गाने मानवाला भरभरून दिले आहे. हा ठेवा जतन करण्याचे काम नवीन पिढीच्या माध्यमातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन परभणी येथील कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांनी केले. येथील कृषी महाविद्यालय, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते, तर उद्घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, डॉ. विलास पाटील हे होते. मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, शरद शिनगारे, डॉ. संदीप घोणसीकर, डॉ. प्रताप नाळवंडीकर, डॉ. गोविंद मुंडे, राजाराम बर्वे यांची उपस्थिती होती. गाव शिवारात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वनस्पती आरोग्यवर्धक असून, मानवाच्या समतोल आहारात रानभाज्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही डॉ. कदम म्हणाले. शेतकऱ्यांनी रानभाज्यांच्या व्यवसायातून उत्पन्न वृद्धिंगत करावे, पोषण मूल्यांतून आरोग्य संवर्धन बळकट करावे. रानभाज्यातून आहारात खनिजे, जीवनसत्त्वे, क्षार व औषधी गुणधर्म परिपूर्ण व मुबलक प्रमाणात मिळतात. त्याचा वापर प्रत्येक ऋतुमध्ये करणे क्रमप्राप्त आहे, असे प्राचार्य ठोंबरे यांनी समारोपात सांगितले. यावेळी सहभागी शेतकरी व महिला यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदर्श शेतीनिष्ठ शेतकरी विद्या रूद्राक्ष व ज्ञानोबा कदम यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. मोहन धुप्पे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी आभार मानले.

४५ प्रकारच्या रानभाज्या

रानभाजी महोत्सवात ४५ प्रकारच्या विविध रानभाज्या व ३० रानभाज्यांच्या वेगवेगळ्या पाककृती तयार करून प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. यात वाघाटे, रानकांदा, पानाचा ओवा, आंबाडी, अगरडा, टाकला, करटोली, घोळ, पुदीना, फांजी, कुंडलिक काकडी, कवट, हादगा, पिंपळ, उंबर, शेवगा, कुरूडू, मोह, तांदूळजा, भुई आवळा, बांबू, कपाळ फोडी, पाथरी, रानकेळी, काटेमाठ, केना, आंबुशी, भोकर, करवंद, रानवांगे, जंगली टमाटे, पाषाण शेपू, डोंगरी कोरफड आदी रानभाज्यांचा समावेश होता.