परळी : तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश वसंत केदार हे जखमी झाले आहेत. त्यांनी धर्मापुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून, सोमवारी परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शिंदे व वनपरिमंडळ अधिकारी बी. जी. कस्तुरे यांनी जखमी शेतकºयाची भेट घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला.
परळी तालुक्यात बिबट्याचा संचार असल्याचे रविवारच्या भोजनकवाडी येथील प्रकारावरून सिध्द झाले आहे. दुपारी २ वाजता भोजनकवाडी येथील स्वत:च्या शेतात अंकुश केदार हे काम करत होते. विहिरीतील पाणी पिऊन ते शेतात उभे असतानाच अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांनी बिबट्याचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या पळून गेला. हल्ल्यामध्ये केदार यांच्या चेह-यास व पायास जखम झाली आहे. त्यांच्यावर धर्मापुरीच्या खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
या प्रकारमुळे भोजनकवाडीतील शेतकरी बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. हा बिबट्या मालेवाडी परिसरात आल्याची चर्चा आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे वनपरिमंडळ अधिकारी बी. जी. कस्तुरे यांनी भोजनकवाडी येथे जाऊन घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. तसेचजखमीची भेट घेतली आहे. अंकुश केदार यांची प्रकृती उत्तम असल्याची अधिकाºयांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी वानटाकळी शिवारात बिबट्या दिसला होता. यामुळे परळी तालुक्यात बिबट्या असल्याचे सिध्द होत आहे.