शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

हद्द झाली ! माजलगाव पालिकेत २० वर्षांत बोगस कर्मचाऱ्यांवर २१ कोटींचा खर्च झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 7:17 PM

जिल्हा प्रशासनाने २० वर्षात पदावर कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची यादी मागवली आहे

ठळक मुद्देमाजलगाव नगर परिषद बोगस कर्मचारी प्रकरण  पदाधिकारी, अधिकाऱ्यांवरील जबाबदारी निश्चित करण्यास वेग १८२ बोगस कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा कयास

माजलगाव :येथील नगर पालिकेतील तब्बल १८२ बेकायदेशीर व बोगस रोजंदारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून मुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यानंतर पुढील कारवाईस वेग आला आहे. जिल्हा प्रशासनाने २० वर्षात पदावर कार्यरत असलेल्या मुख्याधिकाऱ्यांची यादी मागवली असून, या काळात वरील १८२ कर्मचाऱ्यांच्या पगारावर तब्बल २१ कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा कयास आहे. दरम्यान, या नियुक्ती बाबत पदाधिकारी व मुख्याधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश असल्याने पदाधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

येथील नगर परिषदेत सत्ताधारी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या विरोधात आ. प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.  नगरपरिषदेत बोगस कर्मचारी मोठया प्रमाणात असल्याने परिषदेवर आर्थिक भुर्दंड लादलेला असल्याने यात चौकशी व कार्यवाही करण्याची तक्रार आ. सोळंके यांनी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी २००० पासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेल्या वेतनाची रक्कम तत्कालीन मुख्याधिकारी व कर्मचारी यांच्या नावासह परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे  ८ जून रोजी आदेश देण्यात आले.  आता या कारवाईस वेग आला असून, यादी तयार करण्यात येत आहे. या २० वर्षात किमान ५० मुख्याधिकारी बदलले असावेत, असा अंदाज आहे. सध्या माजलगाव नगर परिषदेचे हे प्रकरण चांगलेच गाजत असून, या प्रकरणावर नागरिकांत चवीने चर्चा केली जात आहे.

वीस वर्षांतील वेतनाची अंदाजित रक्कमनगर परिषदेत फिल्टर लेबर २४ (४ कोटी ३ लाख), फिक्स पे वसुली कर्मचारी ५ ( ८४ लाख), विद्युत विभाग कर्मचारी ६ (६८ लाख), अग्निशमन दल कर्मचारी १५ ( ३ कोटी २४ लाख),तात्पुरते साफसफाई कर्मचारी ९२ ( ८ कोटी १४ लाख)तसेच नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष यांच्या वैयक्तिक कामावरील कर्मचारी ४० (४ कोटी ८० लाख) असे एकूण १८२ कर्मचारी यांच्या वेतनापोटी दरमहा १० लाख  रुपये खर्चाच्या नोंदी आहेत. याप्रमाणे २० वर्षात एकूण अंदाजे २१ कोटी रुपये खर्च झाला असावा असा अंदाज येथील कर्मचारी वर्गातून वर्तवण्यात आहे. १८२ पैकी ११० कर्मचाऱ्यांच्या नावावर पदाधिकारीच पगार उचलत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

खोरे, झाडू, टोपल्यावरही खर्चदरम्यान नगर परिषदमध्ये कर्मचारी बोगस असल्याच्या आ.सोळंके यांच्या तक्रारीनंतर नवीन प्रश्न उपस्थित होत आहे. मागील २० वर्षात सदरील १८२ कर्मचाऱ्यांच्या नावावर  दाखवण्यात आलेल्या साहित्य व कामावर देखील करोडो रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. यामध्ये खोरे,टोपली, झाडू, डिझेल, ट्यूब-टायर,यासह इतर साहित्यावर देखील मोठा खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. त्याची पण चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

आपण संपूर्ण २० वर्षातील किती मुख्याधिकारी,पदाधिकारी होते याची  माहिती मागवली आहे. ती मिळाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.    - मिलिंद सावंत, जिल्हा प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद प्रशासन बीड.