लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सुमित वाघमारे या युवकाचा खून हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट होत आहे. कट रचणाऱ्या कृष्णा क्षीरसागर याला बीड पोलिसांनी सोमवारी सकाळी बेड्या ठोकल्या. घटनास्थळावरचा लाईव्ह रिपोर्ट एका मोबाईलवरुन कृष्णाला मिळत होता हे तपासातून समोर आले आहे. तसेच यातील मुख्य आरोपी मात्र अद्यापही मोकाटच आहेत.१९ डिसेंबर रोजी बीड शहरातील तेलगाव नाक्यावर भाग्यश्री व सुमित वाघमारे हे दाम्पत्य अभियांत्रिकीची परीक्षा देऊन घरी निघाले होते. एवढ्यात भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ हे कारमधून आले.काही समजण्याच्या आतच भाग्यश्रीला दुचाकीवरुन ढकलत सुमितवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यामध्ये सुमित जागेवरच कोसळला अन् ठार झाला. त्यानंतर दोघांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाच पथके नियुक्त केली होती.मुख्य आरोपी बालाजी व संकेत हे अद्यापही मोकाटच असले तरी हा खून पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. बालाजीचा मामेभाऊ कृष्णा क्षीरसागर हा यामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात कृष्णाच बालाजी व संकेतला सूचना करीत होता. घटनेवेळी कृष्णाला अन्य एक आरोपी मोबाईलवरुन संपूर्ण माहिती देत होता. खून झाल्यानंतर चौथ्या आरोपीने मुख्य आरोपींना पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.गुन्ह्यासाठी वापरलेली कार अयोध्यानगरात सोडून बालाजी व संकेत चौथ्या आरोपीने तयार ठेवलेल्या दुचाकीवरुन औरंगाबादमार्गे पुण्याला पळाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. कृष्णाला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप अधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखा निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, पंकज उदावंत हे पथक तपास करीत आहेत.समजावून सांगितल्यानंतरही विरोध सुरुचभाग्यश्री व सुमितच्या प्रेमप्रकरणाबद्दल गवगवा होताच कृष्णाने त्या दोघांनाही समजावून सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याला विरोध केला. वारंवार सांगितल्यानंतरही त्यांच्यात बदल न झाल्याने समाजात बदनामी झाली. हाच राग मनात धरुन सुमितचा काटा काढल्याचे समोर येत आहे.अगोदरच रचला कटमागील तीन महिन्यांपासून कृष्णा व बालाजी यांच्यात संपर्क होता. सुमितला धडा शिकवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी १९ डिसेंबर रोजी सुमितचा काटा काढून पलायन केले.२२ जण रडारवरया प्रकरणाशी संबंधित तब्बल २२ जणांची यादीच पोलिसांनी तयार केली आहे. यामध्ये काहींना साक्षीदार बनविले जाणार असून, काहींच्या आरोपींच्या यादीत नाव येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.कृष्णाचे साथीदारांसह पलायनसुमितचा खून झाल्याचे समजताच बालाजी व संकेत हे दुचाकीवरुन पसार झाले, तर कृष्णा हा एका चारचाकी वाहनातून आपल्या साथीदारांसह औरंगाबाद मार्गे पुण्याला रवाना झाले. कृष्णाला पुण्यातून बेड्या ठोकल्या, मात्र कटातील चौथा आरोपी अद्यापही फरारच आहे.
मोबाईलवरून मिळायचा खुनाचा ‘लाईव्ह रिपोर्ट !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:48 AM