बीड : ‘‘जे जे आपणासी ठावे, ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन’’, या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे आवाहन समर्थभक्त प्रसाद महाराज रामदासी यांनी केले.
समर्थ पादुका दर्शन दौरा हा बीड, जालना, देऊळगाव, राजा परतुर आणि औरंगाबाद या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी बीड येथे भाविक-भक्तांनी स्वागत केले.
पुढे बोलताना प्रसाद महाराज म्हणाले, दासबोधातील एका समर्थ वचनाला अनुसरून सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यातून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून श्री समर्थ मठ श्री क्षेत्र खातगावच्यावतीने श्री समर्थ व परमपूज्य श्रीधर स्वामींच्या पादुकांच्या माध्यमातून श्री समर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार दौरा आयोजित केला आहे.
यावेळी ह.भ.प. एकनाथ महाराज पुजारी, नंदकुमार रामदासी, कैलास महाराज रामदासी, कृष्णा महाराज रामदासी, अनंतराव ठोसर, सुनील पुराणिक, संजय कुलकर्णी, धनंजय गोस्वामी, बाळासाहेब कुलकर्णी, दत्तात्रय सौंदतीकर, प्रसन्न कुलकर्णी, सुशिला कुलकर्णी, गोले, वैभव शिंदे, अभिजित दीक्षित, तसेच भाविक-भक्तांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात समर्थांच्या पादुकांचे पूजन धनश्री व मकरंद कुलकर्णी, गायत्री अभिजित दीक्षित यांच्याहस्ते करण्यात आले. प्रारंभी नंदकुमार रामदासी, एकनाथ महाराज पुजारी, कैलास महाराज रामदासी, राघवेंद्र गोस्वामी यांनी प्रसाद महाराज रामदासी यांचा सत्कार केला.
010821\01_2_bed_2_01082021_14.jpg
समर्थ रामदास स्वामी