शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

लाल दिव्यासाठी ‘लॉबिंग’ !

By admin | Published: February 25, 2017 12:28 AM

बीड बहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे.

प्रताप नलावडे बीडबहुमताअभावी जिल्हापरिषदेत निर्माण झालेला सत्तास्थापनेचा पेचप्रसंग कसा सुटतो हे पाहणे मोठे रोमांचक ठरणार आहे. तूर्त लाल दिव्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. राकाँतर्फे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके, सारिका सोनवणे व काँग्रेसच्या आशा दौंड या तिघींची नावे पुढे येत आहेत.सर्वाधिक २५ सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ १९ सदस्यांसह भाजपचा क्रमांक लागतो. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिल्यानंतर जिल्हा परिषद राकाँच्याच ताब्यात अबाधित ठेवण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यापुढे आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्यामुळे अनेकांना लाल दिव्याचे वेध लागले आहेत. जिल्हापरिषदेच्या राजकारणात अग्रेसर असलेल्या राष्ट्रवादीमध्ये गट तितके नेते आहेत. सध्या सर्वाधिक सदस्य धनंजय मुंडे गटाकडे आहेत. परळी तालुक्यातील ६, अंबाजोगाई तालुक्यातील ४ व केज तालुक्यातील २ असे एकूण डझनभर सदस्य धनंजय मुंडे गटाचे मानले जातात. ज्याच्याकडे सर्वाधिक सदस्य तो अध्यक्ष हा राकाँचा जुनाच अलिखित नियम. त्यामुळे धनंजय मुंडे ठरवतील तो अध्यक्ष पदाच्या खुर्चीत असेल असे संकेत आहेत. तसे झाले तर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सारिका बजरंग सोनवणे यांची वर्णी लागू शकते. काँग्रेसने परळी तालुक्यात राष्ट्रवादीशी आघाडी केली. याबदल्यात याआधी उपाध्यक्षपद भूषविलेल्या काँग्रेसच्या आशा संजय दौंड यांचे देखील अध्यक्षपदी ‘प्रमोशन’ होऊ शकते.दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून राजकीय विजनवासात असलेले माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगल सोळंके या देखील अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जातात. सोळंके हे अजित पवारांचे खंदे समर्थक असून, त्यांनी माजलगावात सर्वच्या सर्व ७ जागांवर राकाँला विजय प्राप्त करून दिला आहे. शिवाय, वडवणी - धारूर तालुक्यात त्यांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीला लाल दिव्याची लॉटरी लागू शकते.इकडे अल्पमतात असलेल्या भाजपनेही सत्तास्थापनेसाठीचा ३१ हा जादुई आकडा गाठण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. रणांगणातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपने रणनीती आखणे सुरू केले आहे.