शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास कुलूप ठोकले; तिघांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:11 AM

मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली.

ठळक मुद्देपरळीतील घटना : मुख्याध्यापकास जिवे मारण्याची दिली धमकी

बीड : मुख्याध्यापकाच्या कार्यालयास अधिकार नसताना कुलूप लावले, तसेच त्यावर नोटीसही चिटकवली. ही घटना २२ जानेवारी रोजी परळी शहरातील गणेशपार भागातील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात घडली. याप्रकरणी तिघांविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयात नंदकिशोर पापालाल मोदी हे मुख्याध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना लाच घेताना एसीबीने पकडले होते. याच संधीचा फायदा घेत परळीतील संजय सुशील देशमुख, सुवर्णा हरीश देशमुख आणि रविंद्र सुशिल देशमुख हे शाळेत गेले. मोदी यांच्या कार्यालयास कुलूप लावले. त्यावर खोटी नोटीसह चिटकविली. तसेच ‘तुला निलंबीत केले आहे’ असे म्हणत मारण्याची धमकी दिली. २२ जानेवारीला ही घटना घडल्यानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात मोदी यांनी अर्ज केला. देशमुख यांनी आपण संचालक असल्याचे सांगितले. पोलिसांनी धर्मादाय आयुक्ताला पत्र पाठवून खात्री केली असता ते संचालक नसल्याचे समोर आले. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी मोदी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप हे तिनही आरोपी फरार आहेत. या सर्व आरोपींना लवकरच अटक करू, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी