- सतीश जोशी, बीड
बीड लोकसभा मतदारसंघांच्या २००९ आणि २०१४ निवडणुकांचा तुलनात्मक अभ्यास केला, तर प्रमुख पहिल्या दोन उमेदवारांस उर्वरित उमेदवारांकडून जवळपास एक लाख मतांचा फटका बसला आहे. उर्वरित उमेदवारांनी २००९ मध्ये १० टक्के, तर २०१४ मध्ये ८ टक्के मते घेतली होती.
२००९ मध्ये भाजपचे गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांच्यात लढत झाली. १० लाख ७४ हजार ५२ मतांपैकी मुंडे यांना ५ लाख ५३ हजार ०४२ (५१.६१ टक्के) तर आडसकर यांना ४ लाख १३ हजार ४२ (३८.५ टक्के) मते मिळाली होती. मुंडे हे १ लाख ४० हजार ९५२ मतांनी विजयी झाले होते. या दोघांची घेतलेल्या मतांची टक्के ९०.१ टक्के येते. उर्वरित १९ उमेदवारांनी मिळून १० टक्के मते म्हणजे १ लाख ७ हजार १६ मते खाल्ली होती. १९ जणांमध्ये ८ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे, तर ११ उमेदवार अपक्ष होते. नोंदणीकृत पक्षाच्या ८ उमेदवारांनी ५१ हजार ४१३ मते तर ११ अपक्ष उमेदवारांनी ५५ हजार ६०३ मते घेतली.
१,३६,४५४ मतांनी विजयी २०१४ मध्ये भाजपचे गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस यांच्यात लढत झाली. १२ लाख ३२ हजार २०२ मतांपैकी मुंडे यांना ६ लाख ३५ हजार ९९५ (५१.६१ टक्के) तर धस यांना ४ लाख ९९ हजार ५४१ (४०.५ टक्के) मते मिळाली होती. मुंडे हे १ लाख ३६ हजार ४५४ मतांनी विजयी झाले होते. या दोघांची घेतलेल्या मतांची टक्के ९२.१ टक्के येते. ३७ उमेदवारांना ८ टक्के मते : याचाच अर्थ ३९ पैकी उर्वरित ३७ उमेदवारांनी मिळून ८ टक्के मते म्हणजे ९९ हजार ६६६ मते खाल्ली होती. ३७ जणांमध्ये ११ उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे, तर २६ उमेदवार अपक्ष होते. या दोन्हीही निवडणुकांमध्ये उर्वरित उमेदवारांनी घेतलेल्या मतांचा फटका हा प्रमुख उमेदवारांना बसला आहे. 70,000 मते अपक्षांना नोंदणीकृत पक्षाच्या ११ उमेदवारांनी २६ हजार ३४० मते तर २६ अपक्ष उमेदवारांनी ७० हजार ३२६ मते घेतली.