Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:50 PM2019-03-29T17:50:14+5:302019-03-29T17:51:03+5:30

पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे. 

Lok Sabha Election 2019: Three police officers suspended in Beed in the case of a attack on Congress activist | Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

Lok Sabha Election 2019 : काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात बीडमध्ये तीन पोलीस निलंबित

Next

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयात नेमून दिलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर न राहता इतरत्र फिरणाऱ्या एस.पी. शेळके, पी.के. सानप हे हवालदार आणि डी.व्ही. चाटे या महिला शिपायाला गुरुवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी निलंबित केले. लोकसभा निवडणुकीचे वातावरण असतानाही या पोलिसांना कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी अर्जांची छाननी करण्याचे काम सुरु असताना भाजपच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांनी दिलेल्या घोषणापत्रात माहिती लपवल्याचा आक्षेप कॉँग्रेसचे पदाधिकारी दादासाहेब मुंडे यांनी मतदार या नात्याने घेतला. मात्र, ते उमेदवार नसल्यामुळे त्यांचा आक्षेप फेटाळण्यात आला. त्यामुळे दादासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खाली आले असताना कार्यकर्त्यांच्या जमावाने त्यांना बुधवारी मारहाण केली होती. 

मारहाणीच्या वेळी होते गैरहजर 
घटना घडली त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे तिघेही कर्तव्यावर होते. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना बंदोबस्त दिला होता. बुधवारी दुपारी पावणेपाचच्या सुमारास  सुमारास येथे मारहाणीची घटना घडली. यावेळी हे तिघेही गैरहजर होते. त्यामुळे प्रकरण वाढले. पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनेचा आढावा घेतल्यानंतर हे तीनही कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर असल्याचे समोर आले. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या तिन्ही कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांची चौकशीही सुरू केली आहे.

सर्वत्र तगडा बंदोबस्त  
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बुधवारी मारहाणीची घटना घडल्यानंतर गुरूवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. मुख्य प्रवेशद्वाराजवळ राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली होती. शिवाय परिसरातही ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त करून त्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी दिले होते.

मारहाणप्रकरणी एकाला अटक
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कॉँग्रेस पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी सायंकाळी शेख इरशाद नामक युवकास अटक करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २५ जणांवर मारहाणीचा तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान गुरुवारी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे व सपोनि दिलीप तेजनकर यांनी बालेपीर भागातून शेख इरशाद यास ताब्यात घेतले. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या दोन पोलीस हवालदार आणि एका महिला पोलीस शिपायाने गैरहजर राहून कर्तव्यात कसूर केल्याने त्यांचे निलंबन केले आहे. - जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड
 

Web Title: Lok Sabha Election 2019: Three police officers suspended in Beed in the case of a attack on Congress activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.