"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 07:36 PM2024-05-07T19:36:35+5:302024-05-07T19:37:52+5:30
मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)
इंडी आघाडीचा एकच अजेंडा आहे. ते सरकारमध्ये आले, तर मिशन कॅन्सल चालवणार. ते म्हणाले, इंडीवाले सरकारमध्ये आले तर, ते आर्टिकल 370, जे मोदीने हटवले आहे. ते पुन्हा आणतील, इंडीवाले सरकारमध्ये आले, तर मोदीने जो सीएए आणला आहे, तो कॅन्स करतील, इंडीवाले सरकारमध्ये आले तर मोदीने तीन तलाक विरोधात जो कायदा आणला आहे तो कॅन्स करतील, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते बीडमधील अंबाजोगाई येथे भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी किसान सन्मान निधाची, मोफत उपचार, मोफत राशन आणि राम मंदिराचाही उल्लेख केला.
मोदी म्हणाले, "हे लोक, मोदी जो किसान सन्मान निधाची पैसा शेतकऱ्यांना पाठवतो तो कॅन्सल करतील, मोदी गरीबांना मुफ्त राशन देत आहे, ते कॅन्सल करतील, आम्ही देशातील 55 कोटी गरिबांना 5 लाखांपर्यंतचा मोफत उपचार देत आहोत, काँग्रेस एनडीएची ही योजनादेखील कॅन्सल करेल. एवढेच नाही, तर इंडी आघाडी वाले राममंदिरही कॅन्सल करतील." मोदींच्या या विधानावर उपस्थित जनतेतून (जय श्रीराम... जय श्रीराम... अशा घोषणाही आल्या.)
मोदी पुढे म्हणाले, आपण आश्चर्य वाटून घेऊ नका, पण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, न्यायालयातून जेव्हा राममंदिराच्या बाजूने निर्णय आला होता, तेव्हा शहजाद्याने (राहुल गांधींना उद्देशून) खास लोकांची मिटिंग बोलावली होती. शहजादा म्हणाला होता, काँग्रेस सरकार आल्यानंतर, राममंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू. यांच्या वडिलांनी तीन तलाक प्रकरणात शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्मय बदलला होता. म्हणत आहेत, त्याच पद्धतीने राम मंदिराचा निर्णयही बदलू."
आजच इंडी आघाडीच्या आमखी एका नेत्याने म्हटले आहे की, राममंदिर बेकार आहे. हेच नेते पूर्वी प्रभू रामचंद्रांच्या पुजेला 'पाखंड' म्हटणाले आहे. मात्र, हे नेते इतर कुठल्याही धर्मासाठी असे स्वप्नातही बोलण्याची हिंमत करू शकत नाही. मात्र तुष्टीकरण आणि व्होट बँकेसाठी हे लोक वारंवार प्रभू श्रीराम आणि राम भक्तांचा अपमान करत आहेत. अशा लोकांचे इंडी आघाडी महाराष्ट्राचा गौरव वाढू शकेलक का? (लोकांतून आवाज नाही...).