बीड : जेव्हा समाजात विषमता, अन्याय पसरतो तेव्हा देवी दुर्गेचे रूप घेऊन अन्याय संपवते, याचे आजचा विजयादशमी प्रतिक आहे, असा संदर्भ देत खा. प्रीतम मुंडे ( MP Pritam Munde ) यांनी पंकजा ताईचे ( Pankaja Munde ) पालकमंत्री असताना मायाळू, सोज्वळ , सहनशील रूप पाहिले आहे आता दुर्गेचे रूप पहा असेच संकेत आज सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ( Dusehara Melava Sawargaon ) दिले.
खा. प्रीतम मुंडे पुढे म्हणाल्या, संत भगवान बाबांच्या जन्मभूमीतला हा दसरा मेळावा कोणत्या पक्षाचा मेळावा नाही. तर भगवान बाबांच्या भक्तांचा, सर्वसामान्य, वंचितांना ऊर्जा देणारा मेळावा आहे. आमचे वडील गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वाद आहे. येथे आलेला प्रत्येक माणूस काही अपेक्षा घेऊन आला आहे. काही जणांनी मला विचारले मुंडे परिवारासाठी हा मेळावा महत्वाचा आहे. मी त्यांना सांगितले, मुंडे परिवार म्हणजे केवळ पंकजा किंवा प्रीतम मुंडे इतकाच नाही. इथे आलेल्या प्रत्येक जन मुंडे परिवारातील आहे.
इथे आलेले सर्वजण आमची संपत्तीआमच्या वडिलांनी सर्वसामान्यांना शक्ती दिली. हीच सर्वसामान्यांची संपत्ती त्यांनी आम्हाला दिली आहे. ज्याज्या वेळी तुम्ही संकटात असाल तेव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत असेही खा. प्रीतम मुंडे म्हणाल्या.