शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

कमी दिवसांत जास्त दारू विकणाऱ्यांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 12:32 AM

मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई : १४ दिवसांत ६९ गुन्हे नोंदवले

बीड : मागील वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांपेक्षा जास्त मद्य विक्री झालेल्या अनुज्ञप्तयांची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सखोल तपासणी केली जात असून दैनंदिन मद्य विक्री, किरकोळ दुकानांच्या कामकाजाच्या वेळा आदी बाबींवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक मोहीम राबविण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागाने ६९ गुन्हे नोंदविले असून एकूण ५२ आरोपींना महाराष्टÑ दारुबंदी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ८.८८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यात १०१ लिटर हातभट्टी दारु, २४ हजार ४२० लिटर हातभट्टी गाळण्यासाठी लागणारे रसायन, १९५ लिटर देशी दारु, ४१ लिटर बीअर, ३२ लिटर ताडी व ७७ लिटर परराज्यातील विदेशी मद्य जप्त केले आहेत.दरम्यान, ३० मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क बीड विभागाचे निरीक्षक एम. ए. शेख, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक घोरपडे, नैबळ, जवान मोरे, एस. के. सय्यद, सांगुळे व जवान सुंदर्डे यांच्या पथकाने बीड तालुक्यातील नवगण राजुरी शिवारातील गावंधरा ओढा व डोमरी नदीच्या परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून २०० लिटर मापाचे १६ लोखंडी ड्रम, ३५ लिटर मापाचे १० प्लास्टिक कॅन व ३ हजार ५५० लिटर गूळमिश्रित फसफसते उग्र वासाचे रसायन असा ९१ हजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट केला. तसेच ज्या हातभट्टींच्या ठिकाणी धाड टाकली तेथे आरोपी मिळून न आल्याने विभागाकडून ६ बेवारस गुन्हे नोंद केले असून हातभट्टी चालकाचा शोध सुरु असल्याचे सांगण्यात आले.आचारसंहितेच्या काळात जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्द विक्री परवानाधारकांकडून त्यांनी दिवसभरात केलेल्या मद्य विक्रीची माहिती मागविण्यात येत असून ही माहिती निवडणूक विभागाकडे सादर करण्यात येत आहे. मद्य विक्री अनुज्ञप्तीधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एन. के. धार्मिक यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग