शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अडसर ठरत असल्याने प्रियकरानेच काढला प्रेयसीच्या बापाचा काटा; बीड पोलिसांनी २४ तासांत केला उलगडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 7:23 PM

हत्याऱ्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता.

बीड/सिरसाळा : परळी तालुक्यातील कवडगाव घोडा येथे शेतातील आखाड्यावर झोपलेला सालगडी सुदाम नामदेव देवकते (वय ६०, रा.कौडगाव घोडा, ता. परळी) यांचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली होती. यावेळी हत्याऱ्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता उलट देवकते यांनी आत्महत्या केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करत अवघ्या २४ तासात याचा उलगडा करून आरोपीला बेड्या ठोकल्या. देवकते यांच्या मुलीच्या प्रियकरानेच त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. 

सुदाम हे गावातीलच माणिक भगवान कोळेकर यांच्याकडे वर्षभरपासून सालगडी म्हणून कामावर होते. २ मार्च रोजी भजन ऐकून शेतात परतल्यानंतर माणिकला सुदाम दिसले नाहीत.  त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी रक्त सांडलेले दिसल्याने माणिकने आजबाजूच्या लोकांना बोलावून सुदामचा शोध सुरु केला. तेंव्हा शेतातील विहिरीच्या कडेला सुदामचे बूट दिसले. त्यानंतर विहिरीत पहिले असता आतमध्ये सुदामचा मृतदेह दिसून आला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. श्वानपथक आणि फोरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु, खुन्याने कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने प्रकरण किचकट झाले होते. 

मुलीच्या वर्तनातून आला संशय

प्रथमदर्शनी हा प्रकार चोरीचा असावा अशी शक्यता समोर आली होती. मात्र, आखाड्यावर कुठलीच वस्तू चोरीला गेली नसल्याने पोलिसांनी इतर दिशांनी तपासकार्य सुरु केले. दरम्यान, मयताच्या घटस्फोटीत मुलगी सविता (नाव बदलले आहे) हिचे गावातील अंकुश कोळेकर याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अंकुशला ताब्यात घेतले. सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अंकुशने पोलिसी खाक्या दाखवताच त्यानेच सुदामचा खून केल्याची कबुली दिली. 

शेतमालक कीर्तनला गेल्याची सांधली संधी २ मार्च रोजी सुदाम व शेतमालक माणिक शेतात मुक्कामी गेले होते. मात्र एकादशी असल्याने माणिक हे बाजूच्या वस्तीवर भजन ऐकण्यासाठी गेले. त्यामुळे शेतात सुदाम एकटेच झोपले असल्याची संधी साधून अंकुशने लाकडी दंडुक्याने त्यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात किरकोळ शरीरयष्टीचे सुदाम बेशुद्ध पडले. त्यानंतर रक्त पाहून घाबरलेल्या अंकुशने त्यांना फरफटत नेऊन विहिरीत टाकले. सुदामने आत्महत्या केल्याचे भासावे यासाठी अंकुशने त्यांचे बूट आणून विहिरीजवळ ठेवले होते. 

तपास करणाऱ्या टिमला ‘रिवॉर्ड’हा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, डॉ.अर्जून भोसले, सिरसाळ्याचे सहा. निरीक्षक साहेबराव राठोड, उपनिरीक्षक जनक पुरी यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. याप्रकरणी गोपनीय माहिती काढून तत्परतेने आरोपीस बेड्या ठोकल्याबद्दल पोलीस कर्मचारी रमेश सिरसाट, भास्कर केंद्रे, सचिन सानप, दिलीप गित्ते, विष्णू फड, अर्शद सय्यद यांचे पोलीस अधीक्षकांनी स्वागत करून त्याना ‘रिवॉर्ड’ जाहीर केला आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस