शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

माफियांवर कारवाई; ५४ लाखांच्या मुद्देमालासह वाळू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:01 AM

तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

गेवराई : तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यात विविध ठिकाणी अवैधरीत्या वाळू तस्करी चालू असल्याची माहिती नायब तहसीलदार अभय जोशी, प्रशांत जाधवर यांना मिळाली. त्यानुसार १९ व २२ जानेवारी रोजी महसूल पथकाने बागपिंपळगाव, पाडळसिंगी येथील टोल नाका ठिकाणी व गेवराई बायपास रोडवर सापळला रचून वाळू तस्करी करणारे तीन टिप्पर (क्र .एमएच २३/एयु१३५९, एमएच०४/एफ९४३४ तर टॅक्टर क्र . एमएच २३/बी ७३८८) ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. या वाहनांवर अंदाजे ७ लाख ९९ हजार रूपयाचा दंड आकारण्यात आला असून, वाहनासह अंदाजे ५४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई नायब तहसीलदार अभय जोशी, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलाठी जितेंद्र लेंडळ, कमलेश सुरावर, काशीद, केरु लकर, ससाने, निशांत ठाकुर, सुनील तांबारे आदींनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.राजापूरजवळ वाळूचा ट्रॅक्टर पकडलातलवाडा : गेवराई तालुक्यातील राजापूर व गंगावाडी या गावांच्या परिसरातून अवैधरित्या उपसा करुन वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल कर्मचाºयांनी पकडला. मंगळवारी तलाठी आंधळे व डोफे यांनी ही कारवाई केली.अनेक दिवसांपासुन या गावातून होत असलेला वाळू ऊपसा पात्रात पाणी आल्याने, बंद होता मात्र काही दिवसांपासून वाळू उपसा परत सुरु झाला. बुधवारी गंगावाडी व राजापूर हद्दीतून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर तलाठी आंधळे व डोफे यांच्या निदर्शनास आला.त्यावर त्यांनी तो ट्रॅक्टर पकडून तहसीलला लावला आहे. या कारवाईमुळे वाळु माफियांचे धाबे दणाणले आहे. तलाठी आंधळे यांनी काही दिवसांपुर्वीच राजापुर सज्जाचा पदभार घेतला असुन तात्काळ झालेल्या या कारवाईमुळे अवैध वाळु ऊपश्यावर नियंञण येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग