धारूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाचे महादेव तोंडे बहुमताने विजयी झाले. भाजपाच्या विजयासाठी रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे हे येथे ठाण मांडून बसले होते. बाजार समिती भाजपाचे ताब्यात ठेवण्यात त्यांना यश आले.
धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजपाच्या ताब्यात असून येथील सभापती व उपसभापतीच्या निवडणुकीत ही संस्था ताब्यात ठेवण्यासाठी संचालकात फूट पडणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार होती. त्यानुसार भाजप नेते रमेशराव आडसकर व राजाभाऊ मुंडे यांनी सभापती निवडीणुकीत भाजपाचे दहा सदस्य एकत्र ठेवण्यात यश मिळविले. सभापतीपदी सुनील शिनगारे यांची निवड झाली. त्यानंतर उपसभापती पद ताब्यात ठेवणे भाजपसाठी आवश्यक हाेते. शुक्रवारी झालेल्या निवडीच्या वेळी भाजपाकडून महादेव तोंडे यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रेणुका श्रीराम बडे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामध्ये भाजपाचे महादेव तोंडे यांना दहा मते मिळाली. या निवडीनंतर साजरा केला. भाजपाला ही संस्था ताब्यात ठेवण्यात यश आले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
130821\img-20210813-wa0079.jpg
महादेव तोंडे उपसभापती