परळी : परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडेंनी आज सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान दुपारी परळी शहरातून रॅली व जाहीर सभेने मुंडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
आज सकाळी धनंजय मुंडे यांनी परळी येथे प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले, त्यानंतर जन्मगाव नाथरा येथे ग्रामदैवताचे दर्शन व गावातील ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद घेतले. दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या गोपीनाथगड येथील समाथीस्थळी तसेव वडील दिवंगत पंडीतअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जावून त्यांनी दर्शन घेतले. नाथरा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासही त्यांनी अभिवादन केले. तसेच आई रूक्मीणबाई मुंडे व कुटुंबियांनीही त्यांचे औक्षण करून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. त्यानंतर त्यांनी तहसिल कार्यालयात जावून उमेदवारी अर्जाचे 4 संच दाखल केले.
यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, माकपचे नेते कॉ.पी.एस.घाडगे, काँग्रेसचे नेते संजय दौंड, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, दत्ताआबा पाटील, जि.प.सदस्य अजय मुंडे, डॉ.संतोष मुंडे, वाल्मिकअण्णा कराड, प्रा.मधुकर आघाव, रा.काँ.तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, रणजित लोमटे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, ज्येष्ठ नेते सोमनाथअप्पा हालगे, उपनगराध्यक्ष अय्यूबभाई पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, एस.एल.देशमुख, कृ.उ.बाजार समितीचे सभापती अॅड.गोविंद फड, पं.स.सभापती मोहनराव सोळंके, सुर्यभान मुंडे, माणिकभाऊ फड, प्रा.विनोद जगतकर, माऊली गडदे, सुंदर गित्ते, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांच्या आशीर्वादाने जिंकुमतदार संघातील प्रत्येक समाज घटकाचा आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे. या आशीर्वादाच्या बळावर आपण विकासाची ही लढाई लढत असून, त्यात आपल्याला नक्की यश मिळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.