शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: "मी आमदार झालो तर तरुणांची लग्न लावून देणार'; उमेदवाराची अजब घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:51 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांना सुरुवात झाली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. कालपासून राज्यभरात प्रचासभांना सुरुवात झाली आहे. परळी विधानसभा मदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरु आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काल एका सभेत बोलताना त्यांनी सर्व तरुणांची लग्न लावून देण्याबाबत आश्वासन दिले. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय

काल परळी येथील सभेत बोलताना देशमुख यांनी आश्वासने देत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. राजेसाहेब देशमुख म्हणाले, तरुणांना पाहुणा म्हणून या गावात येत असताना लोक विचारतात पोराला नोकरी आहे का? आता सरकारच देत नाहीतर कुठून लागणार. पुन्हा लोक विचारतात काही उद्योगधंदा करताय का? आता पालकमंत्र्यांचाच उद्योग काही चालेना मग तुमचा काय चालणार आहे, त्यांनी एकही उद्योग उभा केला नाही असं असेल तर एकाही मुलाच लग्न होणं अवघड आहे. पण सर्व तरुणांना मी आश्वासन देतो जर मी आमदार झालो तर सगळ्यांचं लग्न करु, सगळ्यांना कामधंदा देऊ, असं आश्वासन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी दिले.   

तरुणांची काम करणार आहे. गेल्या सात वर्षापासून या भागात लोडशेडिंग आहे. त्यावर काम करायचे आहे, असंही देशमुख म्हणाले. यावेळी राजेसाहेब देशमुख यांनी धनजंय मुंडे यांच्यावर टीकाही केली.

धनंजय मुंडे- राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत

परळी विधानसभा मतदारसंघात एकूण  58 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दहा उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये अवैध ठरले होते. 48 उमेदवारांचे अर्ज छाननी मध्ये वैध ठरले होते. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी एकूण 35 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतले आहे. यापूर्वी दोघाजणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता 11 उमेदवार राहिले आहे. अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार पक्षाचे युवक नेते राजेभाऊ फड, अपक्ष उमेदवार राजेश देशमुख  व प्रभाकर वाघमोडे, दिलीप  बिडगर यांच्यासह एकूण 37 जणांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे धनंजय पंडितराव मुंडे व महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेसाहेब श्रीकिशन देशमुख या दोघांमध्ये सरळ लढत होईल.

धनंजय पंडितराव मुंडे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट  , राजेसाहेब श्रीकिशन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, डी एल उजगरे बहुजन समाज पार्टी, केदारनाथ जाधव पीजेंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया. भागवत वैद्य विकास इंडिया पार्टी , साहस  आदोडे मराठवाडा मुक्ती मोर्चा, अल्ताफ खाजा मिया सय्यद अपक्ष ,दयानंद लांडगे अपक्ष, राजेसाहेब सुभाषराव देशमुख अपक्ष ,शाखेर अहमद शेख अपक्ष, हिदायत सादिक अली सय्यद अपक्ष यांचा समावेश आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BeedबीडElectionनिवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार