- सतीश जोशीबीड : परळी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या चुलत बहीण-भावात होत असलेली अटीतटीची लढत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांसाठीही राजकीयदृष्ट्या अस्तित्वाची लढाई आहे.पंकजा आणि धनंजय मुंडे हे २०१४ मध्येही एकमेकाच्या विरोधात लढले होते. परंतु, २५ हजारांच्या मताधिक्याने पंकजा विजयी झाल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे निर्माण झालेल्या भावनिक लाटेचा पंकजांच्या विजयात मोठा वाटा होता. आता तुल्यबळ लढत होत आहे. पारडे कुणाचेच जड म्हणता येत नाही. दोन वेळा पंकजा आणि प्रीतम या लेकींना निवडून दिले, यावेळी लेकास निवडून द्यायचे की नाही, या संभ्रमात त्यांचा समाज आणि मतदार सापडला आहे. केलेला विकास आणि परळीची सामाजिक सुरक्षितता या दोन मुद्द्यावर पंकजा यांचा असलेला भर प्रभावी ठरत आहे. काँग्रेसचे जिल्हा नेते प्रा.टी.पी.मुंडे यांना भाजपत घेऊन पंकजा यांनी निवडणूक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सभेचाही फायदा वातावरण निर्मितीसाठी पंकजा मुंडे यांना होऊ शकतो.जमेच्या बाजू
- ग्रामविकास, महिला व बालकल्याण विकास खात्याच्या वतीने परळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मतदारसंघात अनेक विकासाची कामे झाली. परळी शहराच्या रस्त्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी तर वैद्यनाथ मंदिर परिसर विकासासाठी जवळपास १३३ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला. महिला बचत गट, वैद्यनाथ सहकारी बँक, जिल्हा बँक, जि.प. ताब्यात असल्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो.
- परळी नगर परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, काही जि.प.गट ताब्यात असल्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. २०१४ मध्ये पराभूत झाल्याने बदल म्हणून सहानुभूती. कार्यकर्त्यांचे जाळे. जनसंपर्क, लोकांमध्ये मिसळून त्यांना आपलेसे करण्याचे कसब. वेळी-अवेळी लोकांच्या मदतीला धाऊन जाणे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधितांशी बोलणे, नगर पालिका ताब्यात असल्यामुळे नागरी सुविधांसाठी जनतेशी संपर्क.
उणे बाजू
- वैद्यनाथ साखर कारखान्यातील कामगारांचे वेतनासाठी झालेले आंदोलन, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे रखडलेले काम. परळी बायपास रखडल्याने मतदारांत नाराजी. एमआयडीसीत नवीन उद्योग नाहीत. परळी औष्णिक केंद्र जवळपास बंदच असते. त्यामुळे कर्मचारी, कामगार, मजुरांची संख्या कमी झाली. या केंद्रावर आधारित अनेक व्यवसाय बंद पडल्याने व्यापारी वर्गात नाराजी. औष्णिकच्या राखेमुळे प्रदुषण, रहिवासी त्रस्त.- पंकजा मुंडेंच्या तुलनेत विकासासाठी आणलेल्या निधीचे प्रमाण कमी. परळी पालिका ताब्यात असली तरी पंकजा मुंडे यांनी शहरातील रस्त्याच्या विकासासाठी जवळपास २५ कोटी रुपये देऊन कामांचा शुभारंभही केला. शहरात नाना नानी पार्क, वाचनालये, व्यायामशाळा निधी देऊन पंकजा मुंडे यांनी सुरू केल्या. ग्रामीण भागात विकासासाठी पंकजा यांनी भरीव निधी दिला ही चर्चा धनंजय यांच्यासाठी उणे बाजू.