कडा : भाषण करताना तोलून मोपून करावे लागते.मात्र खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे सरकारचा धंदा झालाय अशी टोकदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ते आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, राष्टवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले,शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या. तर या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय न घेता उलट त्यांची अडवणूक केली. अशा सरकारला धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी भाषणादरम्यान केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी पांडुळे होत्या. तर व्यासपीठावर उमेदवार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, स्वांतत्र्यसेनानी साहेबराव थोरवे, रामकृष्ण बांगर, महेंद्र गर्जे, डॉ. शिवाजीराव राऊत, रामभाऊ खाडे, ठकाराम दुधावडे , आप्पा राख, सतिश शिंदे, सुरेखा तलवार, शिवाजी डोके, रूपेश बेदरे , महेबूब शेख, नवनाथ तांदळे आदींची उपस्थिती होती.