परळी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 17 ऑक्टोबरला परळी येथे वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. या सभेस बीड जिल्ह्यातील महायुतीची सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित राहतील. पंतप्रधान मोदी यांची सभा बीड जिल्ह्याच्या विकासाची नांदी ठरेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. यशश्री या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
20 वर्षापुर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची परळीत सभा झाली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या सभेबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे अशी माहिती मुंडे यांनी दिली. राज्यात भाजप-सेना युतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगत परळीतून आपणच निवडून येणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच विरोधकांकडे एम.आय.डी.सी. व परळी-अंबाजोगाई रस्त्याच्या प्रश्नाशिवाय दुसरे काहीच नाही. परळी-अंबाजोगाई रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले.