शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 5:10 AM

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे.

- सतीश जोशीबीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे. एकूण सहापैकी बीडची जागा शिवसेनेकडून रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाच जागा भाजप लढवित आहे. परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या चुलत बहिण-भावात तुल्यबळ लढत होत आहे. बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्टÑवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. एमआयएमकडून शेख शफिक आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.२०१४ मध्ये परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा जवळपास २५ हजार मताधिक्यांनी पराभव केला होता. २००९ मध्ये पंकजा ३६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी मिळाली नसली तरी धनंजय मुंडे हे भाजपतच सोबत होते. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, परळीत २००९ पासून भाजपचे मताधिक्य ४२ हजारांहून घसरत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही १८ हजारांवर आले होते. माजलगाव आणि केज (राखिव) मध्ये भाजपने विद्यमान आमदारांना नारळ दिला. माजलगावमध्ये रमेश आडसकरांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. रा.काँ.कडून माजी मंत्री प्रकाश सोळंके, केजमध्ये भाजपचे नमिता मुंदडा तर राष्टÑवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे तर आष्टीत भाजपचे आ.भीमराव धोंडे तर राष्टÑवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे उमेदवार आहेत.

रंगतदार लढती२०१४ मध्ये परळीत पंकजा आणि धनंजय यांच्यात लढत झाली. गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे भावनिक वातावरण होते. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. यावर्षीही या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.गेवराईत शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी भाजपा उमेदवार आ.लक्ष्मण पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. या ठिकाणी राष्टÑवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित लढत आहेत. बदामराव हे माजी राज्यमंत्री असून विजयसिंह पंडित यांचे चुलत काका आहेत.बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्टÑवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्यात लढत होत आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत बीडची जागा राखत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांचा त्यांनी सहा हजार मतांनी पराभव केला होता.

प्रचारातील प्रमुख मुद्दे१) महायुतीकडून जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची उजळणी२) परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्ग, वॉटरग्रीड प्रकल्पावर महायुतीचा भर३) विम्यापासून शेतकरी वंचित, औद्योगिक विकास नाही : आघाडीचा आरोप४) कलम ३७०, पाकिस्तानला शिकवला धडा, यावर महायुतीचा भर

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेbeed-acबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019