शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Video: हर हर महादेव! देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2022 2:06 PM

Mahashivratri: श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते.

परळी( बीड ) : हर हर महादेवचा जयघोष करीत भाविकांनी देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे महाशिवरात्रीनिमित्त दर्शन रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून सुरू झाले आहे. श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी सोमवारी रात्री नऊ वाजेपासून मंदिराच्या पायऱ्यावर भक्त थांबलेले होते.

रात्री 12 नंतर मंदिरात भाविकांनी प्रवेश करत महाशिवरात्रीचे दर्शन घेणे सुरू केले. सोमवारी रात्री नऊ वाजता छबिना भजन व  आरती  झाली .त्यानंतर रात्री बाराच्या नंतर महाशिवरात्रीचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेणे सुरू झाले. प्रारंभी मंदिर पुजारी यांनी श्री वैजनाथाची पूजा केली त्यानंतर दर्शन सुरू झाले. महाशिवरात्री निमित्त मंदिरात सनई चौघडाची सुविधा करण्यात आली. तसेच वैजनाथ मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यनाथ मंदिरात सुरक्षेच्यादृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बीड येथील बॉम्ब शोधक व नाशक पथकाने रात्री मंदिर परिसराची तपासणी केली यावेळी सोबत मार्शल डॉग होता.

वैजनाथ देवस्थान ट्रस्टची जोरदार तयारी महाशिवरात्र उत्सवाची श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने जोरदार तयारी केली आहे. महाशिवरात्रीत वैद्यनाथांच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार असल्याने ट्रस्टच्यावतीने महिला, पुरुष व धर्मदर्शन अशा तीन रांगा लावण्यात येणार आहेत. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून मंदिराच्या पायऱ्यावर बॅरिकेट उभारले आहेत. महाशिवरात्रीच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.

भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी केवळ परळीतच भगवान शंकर व माता पार्वतीचे एकत्र निवास असलेले एकमेव ज्योतिर्लिंग आहे.                   पुरातन काळात देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन केले. त्या मंथनातून चौदा रत्ने निघाली. त्यात वैद्यांचा राजा धन्वंतरी व अमृत ही दोन रत्ने होती. ही दोन रत्ने दानवांच्या हाती लागू नयेत म्हणून भगवान श्रीविष्णूने अमृतासह धन्वंतरीला परळीच्या ज्योतिर्लिंगात लपवून ठेवले. दानवांना हे समजताच ते अमृत घेण्यासाठी धावले, परंतु त्यांचा त्या शिवलिंगाला स्पर्श होताच त्यातून अग्नीच्या ज्वाळा निघाल्या. ते पाहून राक्षस पळून गेले. मात्र, शिवभक्तांनी जेव्हा या शिवलिंगाला स्पर्श केला. तेव्हा त्यातून अमृतधारा निघाल्या. तेव्हापासून या ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून भक्त दर्शन घेतात, अशी आख्यायिका आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमशिवक्षेत्र असल्याने महाशिवरात्रीचा उत्सव येथे मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय वर्षप्रतिपदा, श्रावणमास, विजयादशमी, वैकुंठ चतुर्दशी व त्रिपुरारी पौर्णिमेला उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी होते. गुढीपाडव्याला वैजनाथ मंदिरात गुढी उभारण्याचा समारंभ मोठ्या थाटामाटात केला जातो. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक, मंत्रजप चालतात. मंदिराच्या परिसरात कालरात्री देवी मंदिर, अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई, दक्षिणमुखी गणपती मंदिर, श्री संत जगमित्र नागा मंदिर, गोराराम, सावळाराम, काळाराम मंदिर व इतर अनेक मंदिरे येथे आहेत.

टॅग्स :BeedबीडMahashivratriमहाशिवरात्री