ठळक मुद्देआतापर्यंत २२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. बीडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या माध्यमातून अंदाजे साडेचार हजार कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या घोटाळेबाज महेश किसन मोतेवार याला येथील सत्र न्यायालयाने शुक्रवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुदत उलटूनही ठेवी परत न केल्याने बीड शहर ठाण्यात सय्यद रहेमा सय्यद नियामत (रा. इस्लामपुरा, बीड) यांच्या तक्रारीवरून महेश मोतेवार, शशिकांत काळकर व सुनीता थोरात यांच्यावर ३० ऑगस्ट २०१८ रोजी गुन्हा नोंद झाला होता. आतापर्यंत २२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. बीडमध्ये ५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे.