लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने बुधवारी दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेले नाही. विश्ोष पथके तपासासाठी बाहेरच असली तरी आरोपी त्यांना गुंगाराच देत आहेत. केवळ संशयितांची चौकशी बीड पोलिसांकडून केली जात आहे.सुमित वाघमारे खून प्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून गतीने सुरू असला तरी त्यांना बालाजी लांडगे व संकेत वाघ या मुख्य आरोपींपर्यंत पोहचून बेड्या ठोकण्यात अपयश आलेले आहे. मागील तीन दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकांसह पेठबीड ठाण्याची विशेष पथके त्यांचा शोध घेत आहेत. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पो.नि. घनश्याम पाळवदे, स.पो.नि. अमोल धस, दिलीप तेजनकर आदी अधिकारी या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत. तीन दिवस उलटूनही सर्व आरोपींना शोधण्यात अपयश आले आहे.पंचनामा करून शेजाºयांचे जबाब...ज्या ठिकाणी सुमितचा खून झाला होता, त्या ठिकाणचा पेठबीड पोलिसांनी पंचनामा केला आहे. तसेच आजुबाजूच्या जवळपास सात ते आठ लोकांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. तसेच सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे.भाग्यश्रीचा जबाब बाकी४सुमितची पत्नी भाग्यश्री ही अद्यापही या दु:खातून सावरलेली नाही. तिची मानसिकता नसल्याने तिचा जबाब घेणे अद्यापही बाकी आहे. ती स्थिर झाली की, तिचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.मास्टरमार्इंड कोण ?सुमितच्या खून प्रकरणात एकापेक्षा जास्त आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खून आरोपींन शांत डोक्याने केला असावा. या खुनामागे बालाजी, संकेत की अन्य दुसरा कोणी मास्टरमार्इंड आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मुख्य आरोपी मोकाटच; संशयितांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:39 AM
प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने बुधवारी दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेले नाही.
ठळक मुद्देपथके तपासात बाहेरच : वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणा लागली कामाला