बीड : बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी धरणाची पाहणी केली. तसेच योग्य त्या सूचना देत बीडकरांना पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे आवाहन केले.दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. बीड शहराला पाली येथील बिंंदुसरा आणि माजलगाव धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या माजलगाव धरणात ८३.४ दलघमी पाणी साठा आहे. तर बिंदुसरा धरण कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे बीड शहराची संपूर्ण तहान माजलगाव धरणावर भागविली जाणार आहे.या धरणातील पाणी पाहता शुक्रवारी बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाहणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करुन उपाययोजना करण्याबाबत पावले उचलण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.यावेळी त्यांच्यासोबत विलास विधाते, विनोद मुळूक, अभियंता किशोर काळे, अमोल बागलाने आदींसह इतरांची यावेळी उपस्थिती होती.पाणी उपसा थांबविण्याची मागणीमाजलगाव धरणातून मोटारीद्वारे पाणी उपसा होत आहे. हाच धागा पकडून डॉ.क्षीरसागर यांनी वडवणीच्या तहसीलदारांशी संपर्क साधून हा पाणी उपसा थांबविण्याची मागणी केली.सध्या पाच ते दहा दिवसाला पाणीसध्या बीड शहराला दररोज दोन कोटी ८० लाख लिटर पाणी लागते. एवढे पाणी येत असले तरी शहरात पाच ते दहा दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. हद्दवाढ भागात दहा दिवसाला पाणी येते.टंचाई प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडेपाणीटंचाई संदर्भात एक प्रस्ताव तयार करून बीड पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला आहे. यामुळे पाणी नियोजन सुलभ होणार आहे. पाणी कमी होताच चर खोदून मोटारीपर्यंत आणला जाणार आहे.
माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:55 IST
बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या माजलगाव धरणात सध्या मे अखेर पर्यंत पुरेल एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. तसा अहवाल पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे.
माजलगाव धरणात मे अखेरपर्यंतच पुरेल एवढेच पाणी
ठळक मुद्दे‘जल है तो कल है’ : पाण्याचा अपव्यय टाळून जपून वापरण्याचे नगराध्यक्षांचे नागरिकांना आवाहन