शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नगराध्यक्ष निवडीच्या चुरशीत नगरसेविका घरी अन पती,मुले सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 4:29 PM

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीने उभारलेल्या तटबंदीला सुरुंग लागून ऐनवेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- पुरूषोत्तम करवा माजलगाव :  येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या चुरशीच्या निवडणुकीत नगरसेवकांचे मत परिवर्तन करून फोडाफोडीचे राजकारण जोर धरत असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या समर्थनातील नगरसेवकांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. मात्र, सहलीत नगरसेविका घरी आणि पती आणि मुलेच सहलीवर गेले असल्याची माहिती आहे.  खऱ्या मतदार असलेल्या नगरसेविकाच घरी असल्याने त्यांच्या इतर नातेवाईकांच्या मदतीने ऐन निवडणुकीत विरोधक बाजी उलटवीण्याच्या तयारीत आहेत.

माजलगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे यासाठी भाजपाकडून रेश्मा दीपक मेंडके यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून शेख मंजूर यांनी अर्ज भरलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने १७-१८ नगरसेवक आपल्या बाजूने असल्याचा दावा केला असून सदर नगरसेवकांना सहलीवर पाठविले असल्याचे सांगण्यात येते.  यामध्ये राष्ट्रवादी पाठोपाठ मोहन जगताप, सहाल चाऊस या गटांच्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. परंतु, खरंच नगरसेवकच सहलीवर गेलेत का याची चाचपणी केली असता कांही नगरसेविकांचे पती तर काहींची मुले हेच सहलीवर गेली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या निमित्ताने महिला नागरसेविकांचे नातेवाईकच मजा करत असून खरे मतदार असलेल्या नगरसेविका या घरीच असल्याचे चित्र आहे. यावरून नगरसेविकांना त्यांचे अधिकार देखील मनाने वापरता येत नाहीत या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

विरोधक संधी साधणार ?नगरसेविकांचे पती व मुले सहलीवर असताना इकडे त्यांच्या इतर नातेवाईकांना हाताशी धरून दगाफटका घडवून आणण्यासाठी विरोधी गटाने कंबर कसली आहे. यातूनच खऱ्या मतदार असलेल्या नगरसेविकांची मनधरणीचे प्रयत्न देखील सुरू केले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीने उभारलेल्या तटबंदीला सुरुंग लागून ऐनवेळी चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :BeedबीडElectionनिवडणूकMayorमहापौर