माजलगाव (बीड ) : राज्यात राबवण्यात येत असलेल्या छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने आंतर्गत माजलगाव तालुक्यात 71 हजार 635 शेतकर्यांनी आँनलाईन अर्ज भरले होते. त्यातील 13 हजार 902 शेतकर्यांच्या अर्जात ञुटी आढळून आल्या आहेत.
ज्या शेतकर्यांची आँनलाईन माहीती व बँकेने पुरविलेली माहीती यात ताळमेळ होवू शकला नाही असे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये म्हणून शेतकर्यांच्या अर्जातील माहिती व बँकेकडील माहिती यांची केली जात आहे. यातून त्यांची कर्जमाफीची पाञता निश्चित करण्यासाठी शासनाने तालुका सहाय्यक निंबधक एस.बी. घुले यांच्या अध्यक्षते खाली समिती गठीत केली आहे. यात लेखा परिक्षक संस्था सचिव, डि.सी.सी.विभाग. विकास अधिकारी,तालुक्यातील विविध बँकेचे शाखाधिकारी यांचा समावेश आहे.
शेतकर्यांनी अर्जातील व बँककडील माहितीची शहनिशी करून त्यातील त्रुटी दूर करून त्याचा १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले शासनाने दिले आहेत. त्यामुळे बँक अधिकारी व संस्थेशी शेतकर्यांनी तात्काळ संपर्क करुन त्रुटी पूर्ण कराव्यात असे आवाहन सह.निंबधक घुले यांनी केले आहे.