गेवराई : शेतकऱ्यांची वाढीव वीज बिलातून सुटका होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश कोल्हे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन काही निकषांवर शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देत आहे. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव असल्याने शेतकरी पूर्ण देशोधडीला लागलेला आहे. केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. शेतकरी हे वेळेत शेत पंपाचे बिल भरू शकलेले नाहीत. तरी मंत्री महोदयांनी तत्काळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट सौर ऊर्जा उपक्रम योजनेअंतर्गत सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी ॲड. गणेश कोल्हे यांनी केली आहे.
===Photopath===
220521\img-20210522-wa0199_14.jpg