बीड : उन्हाळ्यात आंब्याची मजा काही औरच. बीड शहरात लालबाग आणि बदाम या दोन जातीच्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून आलेला आंबा साधारणत: ५० ते ६० रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. ग्राहक आंबे खरेदीसाठी बाजाराकडे वळत असल्याचे चित्र आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली.
नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : ग्रामीण भागात तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. दुरूस्तीची मागणी आहे.
अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम
माजलगाव : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. गर्मीत पावसाचे वातावरण झाले आहे. याचा परिणाम पिकांवर तर होत आहे. त्याचबरोबर फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्याचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या वातावरणामुळे बहरात आलेल्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसत असून, फळबागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.