अंबाजोगाई : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील १७२ गावांची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात १२ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोटातून पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे याही वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरेल, अशी स्थिती आहे.
यावर्षी जून महिन्यापासूनच दमदार पावसास सुरुवात झाली असल्यामुळे मराठवाड्यात सर्वच मोठी धरणे ओसंडून वाहत आहेत. मांजरा धरणाच्या वरच्या बाजूस नदीच्या उगमस्थानापासून १४ बंधारे आणि लहानमोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आले. अलीकडील काही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाही स्थितीत मांजरा धरणात ९० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा झाला आहे.
मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. रविवारी धरणात १९९.५५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची आवश्यकता आहे.
120921\fb_img_1603433460204.jpg
मांजरा धरण