शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:26 PM

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे

- मधुकर सिरसटकेज ( बीड): धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात आवक वाढून लातूर, धाराशिव आणि बीड या तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेले मांजरा धरण शंभर टक्के भरले आहे. संततधार पाऊस आणि आवक लक्षात घेता शुक्रवारी (दि.२७ ) पहाटे धरणाचे एकूण सहा वक्रदरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदी पात्रात ५ हजार २४१ क्युसेक (१४८. ४४) इतका विसर्ग सूरू असल्याची माहिती धरणाचे शाखाधिकारी सूरज निकम यांनी दिली.

तीन जिल्ह्यांची जीवनवाहिनीधाराशीव जिल्हातील कळंबच्या दाभा व केज तालुक्यातील धनेगावच्या सिवेवर १९८० साली मांजरा नदीवर मांजरा प्रकल्पाची बांधणी झाली. यानंतर या प्रकल्पात प्रथमतः १९८०-८१ हंगामात पाणीसाठा झाला. तो ९७ दलघमी इतका होता. यानंतर पुढील ४४ वर्षाच्या काळात हा प्रकल्प धाराशीव जिल्हातील कळंब, बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई व लातूर जिल्ह्य़ातील लातूर व रेणापूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरत आला. याशिवाय लातूर शहर, लातूर औद्योगिक वसाहत, कळंब, केज, अंबाजोगाई, धारूर, मुरूड अशा शहरासह शेकडो गावातील पाण्याचा प्रश्न भागवणारा प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते.

सतराव्यांदा झाला ओव्हरफ्लो... २०२०, २०२१ आणि २०२२ अशा सलग तीन वर्ष धरण भरले होते. त्यानंतर गतवर्षी २०२३ ला पाऊस कमी झाल्याने धरणात केवळ २९ टक्के पाणीसाठा होता. आता २०२४ ला एक वर्षाच्या खंडानंतर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. २३ व २४ सप्टेंबर रोजी पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. यामुळे ८५ टक्क्यावरचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहचत प्रकल्पाची झोळी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास भरली गेली. ४४ वर्षांच्या इतिहासात पूर्ण क्षमतेने भरण्याची ही सतरावी वेळ आहे.

नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावेजलाशयातून तब्बल ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग करण्यात आल्याने मांजरा नदीला पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. - राकेश गिड्डे, तहसीलदार, केज

जलपुजनासाठी स्पर्धा...मांजरा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मांजरा नदीत होताच जलपुजनासाठी राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते यांच्यात स्पर्धा सुरू झाली. दरम्यान, राहुल खोडसे यांनी गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान पंचक्रोशीतील शेतकरी एकत्र करून जलपुजन केले. तर आ. नमीता मुंदडा, भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, सुनील गलांडे पाटील, तालुकाध्यक्ष भगवान केदार, दिलीप भिसे, रहिमभाई शेख व  तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साडेदहा वाजता जलपूजन केले. जलपुजनाच्या नावाखाली तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणWaterपाणीRainपाऊसBeedबीड