बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मानवलोकमार्फत ३० गावांत निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक भोजनगृहातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी मानवलोक व गिव्ह इंडियामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जवळपास ५ हजार ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये हे समजावणे आणि लसीकरण किती महत्त्वाचे आहे, याबद्दल माहिती देण्याचे कार्य चालू आहे.
या लसीकरण मोहिमेत ३० गावांतील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था, लसीकरण करण्यात मदत, त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहार करवून गावात सोडण्यात येत आहे, तसेच लसीकरणानंतर संभाव्य ताप इत्यादी लक्षणांत देखभाल करण्यात येत आहे.
अशा ज्येष्ठ निराधारांसाठी व परिसरातील गरजूंसाठी कोरोना काळात मानवलोक सातत्याने प्रयत्नशील आहे, असे लोहिया यांनी सांगितले.