अंबाजोगाई व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता स्वा. रा. ती. ग्रामीण रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमधील बेडच्या संख्येत कमतरता दिसून येत आहे. घाटनांदूर, पट्टीवडगाव, धर्मापुरी, उजनी या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण करणे गरजेचे होते. त्यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, जि. प. अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी चर्चा करून प्रशासनाला सूचित केले. या कोविड सेंटरमुळे ग्रामीण भागातील कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो. या कोविड सेंटरकरिता घाटनांदूरचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन यासह परिसरातील सरपंच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
घाटनांदूर कोविड सेंटरला मनुष्यबळ मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:36 AM