किल्लेधारुर (बीड) : तालुक्यातील जहागिर मोहा येथे मराठा आरक्षणासाठी आज सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मराठा ठोक मोर्चा च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण मिळावे तसेच मराठा समाज बांधवावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत आदी मागण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने आज किल्लेधारुर-आंबेवडगांव रस्त्यावरील जहागिर मोहा येथे सकाळी नऊ ते अकरा दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी एक मराठा,लाख मराठा आदी घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला होता.या आंदोलनाला गावातील समस्त गांवक-यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम यांना मराठा ठोक मोर्चा च्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.