अंबाजोगाई (बीड) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने येथील ऐतिहासिक शहा बुरुजावर मराठवाडा जनता विकास परिषदेचे स्थानिक अध्यक्ष डॉ .नरेंद्र काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी व मुलांचा सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी शरद झाडके, संजय सिरसाट, तहसीलदार मिलिंद गायकवाड, मुख्याधिकारी डॉ. अशोक साबळे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटूंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महानंदा बुरांडे, प्रतिभा ठाकूर, डॉ. दिलीप खेडगीकर, डॉ. रत्नाकर काळेगावकर, व्यंकट पवार, पंडितराव भोसले, महानुभाव, विडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी मनोगत व्यक्त केले . डॉ. सुरेश खुरसाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सुरुवातीला संयोजक डॉ .नरेंद्र काळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . रमेश सोनवळकर यांनी केले. तर प्राचार्य डॉ. दामोधर थोरात यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रकाश बोरगावकर, दत्ता देवकते, मनेश गोरे, राजू साळवी , संतराम कराड , जगदीश जाजू , शिवकुमार निर्मळे, विशाल आकाते, प्रा सागर कुलकर्णी , भीमसेन लोमटे, गोविंद टेकाळे, रणजीत मोरे, विलास काचगुंडे,बाळासाहेब फुलझळके, सलिम शेख, प्रा. रोहित पाटील, अतुल कसबे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी, मुन्ना सोमाणी आदींनी सहकार्य केले .