तहसील कार्यालयात तहसीलदार राजाभाऊ कदम, न्या. माने, ज्येष्ठ स्वा.सै साहेबराव थोरवे, माजी आ. साहेबराव दरेकर, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, नायब तहसीलदार महादेव पंढरपुरे, नीलिमा थेऊरकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नीता अंधारे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस आदी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस ठाणे, बांधकाम विभाग, पाटबंधारे कार्यालय, शाळा, महाविद्यालये शासकीय निमशासकीय कार्यालये संस्थांमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. तालुक्यातील खडकत येथे सरपंच रामदास उदमले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ग्रामसेवक नवनाथ लोंढे, ग्रा. पं. सदस्य संजय निर्मळ, विलास फुले, तात्यासाहेब जेवे, मुख्याध्यापक शेख आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील कडा, धामणगाव, धानोरा, अंभोरा, दौलावडगाव, दादेगाव, हरिनारायण आष्टा आदी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कऱ्हेवहगावात ग्रामसभा
तालुक्यातील कऱ्हेवडगाव ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण सरपंच वंदना गायकवाड यांचे हस्ते झाले. ध्वजारोहणानंतर ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी परिवंत गायकवाड, ग्रामसेवक श्रीराम वीर उपसरपंच सुग्रीव नागरगोजे, सदस्य गीतांजली विधाते, सदस्य अर्जुन बांगर, सदस्य जालिंदर खांडवे, गंगाधर गायकवाड, केशव बांगर, जालिंदर गायकवाड, शरद खांडवे, प्रवीण गायकवाड, प्रशांत बांगर उपस्थित होते.
170921\17_2_bed_15_17092021_14.jpg
आष्टीत ध्वजारोहण