माजलगाव (बीड ) : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ या अभियानात माजलगाव नगर पालिकेने घवघवीत यश मिळवले. देशपातळीवर केलेल्या या सर्वेक्षणात नगर पालिकेने देशात ३२ वा, तर बीड जिल्ह्यात अव्वल क्रमांक मिळविला. यासोबतच मराठवाड्यातून ५ वा क्रमांक पटकावला.
केंद्र शासन संपूर्ण देशात स्वच्छतेवर मोठ्याप्रमाणात भर देऊन स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. केंद्राने देशातील सर्वच पालिकेला यात सहभागी करून घेतले आहे. तसेच या कार्यात त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. या साठी देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण- २०१८ असे सर्वेक्षण करण्यात आले. यात देशातील २ हजार ४०० नगर पालिका सहभागी झाल्या. याची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात माजलगाव नगर पालिकेने बाजी मारली असून या अभियानात देशात ३२ वा क्रमांक पटकावला. यासोबतच महाराष्ट्रात १९ वा, मराठवाड्यात पाचवा तर बीड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान नगर पालिकेस मिळाला.
बक्षिसाचे स्वरूपया सर्वेक्षणात यश मिळविलेल्या माजलगाव नगर पालिकेला पारितोषिक, युरोप दौरा, ५ कोटी रुपयाचे बक्षीस दिल्ली येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात देण्यात येणार आहे.
सर्वांचे सहकार्य लाभले अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, यांच्या मार्गदर्शनाखाली मेंटोर सतीश शिवणे, आशिष लोकरे, माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, कमिटी सभापती, दीक्षा सिरसट, पार्वती कदम यांच्यासह शहरातील नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हे यश मिळाले. - सहाल चाऊस, नगराध्यक्ष