शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मराठवाड्यात धुमाकूळ; बीडच्या गँगवर ‘मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:59 PM

बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचोरी, दरोडा, घरफोडीचे गुन्हे : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडसह मराठवाड्यात चोरी, दरोडे, घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.संतोष ओंकार गायकवाड (२३ रा.रामनगर ता.गेवराई), अक्षय भानुदास जाधव (२४ सावरखेडा ता.गंगापूर जि.औरंगाबाद), दीपक बबन गायकवाड (२८ रा.लवूळ ता.माजलगाव), बबन मोतीराम गायकवाड (५६ रा.लवूळ ता.माजलगाव) यांच्यासह अन्य एकाचा टोळीत समावेश आहे. शहाजी भगवान कदम (५५ रा.गवारी ता.बीड) यांचे गवारी फाटा येथे हॉटेल आहे. ६ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ते हॉटेलची सफाई करीत होते.एवढ्यात काळ्या रंगाच्या जीपमधून आलेल्या दरोडेखोरांनी कदम यांच्या गळा दोरीने आवळूण व गळ्याला चाकू लावून हॉटेलच्या गल्यातील १७५० रूपये काढून घेतले. तसेच हॉटेलच्या बाजूला शहादेव लोमटे हे ट्रकमध्ये झोपले होते. त्यांनाही मारहाण करून ते पसार झाले. मारहाण झालेली असतानाही कदम यांनी समयसुचकता दाखवित लाईटच्या उजेडाने जीपचा क्रमांक कैद केला. त्यानंतर या प्रकरणाची नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.त्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथके नियूक्त करून चारही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. त्यांचे रेकॉर्ड काढले असता हे अट्टल दरोडेखोर असल्याचे समोर आले. त्यांनी बीडसह मराठवाड्यात धुमाकूळ घातल्याचे समोर आले.हाच धागा पकडून नेकनूरचे पोनि भाऊसाहेब गोंदकर यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे मोक्काअंतर्गत कारवाईबाबत प्रस्ताव पाठविला. मुत्याल यांच्याकडून त्याला मंजुरीही मिळाली.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पोनि भाऊसाहेब गोंदकर, पोउपनि औटे, मजहर, आधटराव, अभिमन्यू औताडे आदींनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले करत आहेत.मोक्का, एमपीडीएने गुन्हेगारांमध्ये दहशतमागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात गुन्हेगारी करून धुमाकूळ घालणाºयांवर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कारवायांचा फास आवळला आहे. मोक्कासह एमपीडीए कारवायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये बीड पोलिसांची दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी