लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चारित्र्यावर संशय व व माहेरहून दीड लाख रूपये आणत नसल्याने एका विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील हिंंगणी खु. येथे सोमवारी रात्री घडली. मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखल्यानंतर तणाव झाला होता. नातेवाईकांच्या मागणीनुसार पतीसह चौघांविरोधात नेकनूर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पूनम अशोक तांदळे (२३ रा. हिंगणी खु.) असे मयत विवाहितेचे नाव आहे. अशोक ठोंबरे (रा. दहीफळ वडमाऊली ता. केज) यांची मुलगी पूनमचा विवाह सहा वर्षांपूर्वी अशोक तांदळेशी झाला होता. लग्नावेळी तीन लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. मात्र, तेव्हा दीडच लाख रुपये दिले होते. चारचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आण म्हणत सासरच्यांनी पूनमकडे तगादा लावला होता. या कारणावरुन तिला मारहाणही केली जात होती. रविवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर पती व सासू यांनी हुंड्यातील रहिलेले पैसे व चारित्र्यावर संशय घेऊन पूनमशी वाद घालायला सुरुवात केली. वाद टोकाला गेला. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने चौघांनी पूनमचा गळा आवळला. सोमवारी सकाळी ६ वाजता माहेरच्या मंडळींनी पूनमचा मृतदेह वाहनातून जिल्हा रुग्णालयात आणले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नेकनूर ठाण्यात नेले. तेथे गुन्हा नोंद झाल्यावर मृतदेह अंत्यविधीसाठी दहीफळ वडमाऊली येथे नेण्यात आला. दरम्यान, पती अशोक तांदळे, दीर राजकुमार तांदळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सासू व जाऊ या दोघी फरार आहेत.नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखलेजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यावर नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा नोंद करण्यासाठी शवविच्छेदन रोखून धरले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, शहर ठाण्याचे पोनि सय्यद सुलेमान यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांची समजूत घातली. तक्रार नोंदवून घेण्याचे आश्वासन दिल्यावर शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला असून उत्तरीय तपासणीनंतर प्रेत थेट नेकनूर ठाण्यात नेण्यात आले. गुन्हा नोंद झाल्यावरच तेथून प्रेत अंत्यविधीसाठी नेल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
चारित्र्यावरुन विवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:15 AM
चारित्र्यावर संशय व व माहेरहून दीड लाख रूपये आणत नसल्याने एका विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची घटना बीड तालुक्यातील हिंंगणी खु. येथे सोमवारी रात्री घडली. मंगळवारी सकाळी नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखल्यानंतर तणाव झाला होता.
ठळक मुद्देआत्महत्येचा बनाव : पतीसह चौघांवर नेकनूर ठाण्यात गुन्हा