शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

केंद्रीय समितीकडून शाळांसह बाजारपेठेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:51 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत बीड शहर तपासणीसाठी मागील तीन दिवसांपासून केंद्रीय समिती बीडमध्ये ...

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण-२०१८ : तीन दिवसांपासून समिती बीडमध्ये; आजही करणार पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ अंतर्गत बीड शहर तपासणीसाठी मागील तीन दिवसांपासून केंद्रीय समिती बीडमध्ये तळ ठोकून आहे. बुधवारी शाळा, महाविद्यालयांसह निवासी तसेच बाजारपेठ परिसराची पाहणी केली. तीन दिवसांचा हा दौरा होता. परंतु तपासणी पूर्ण न झाल्याने गुरूवारीही शहराची तपासणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड नगर पालिकेच्या वतीने मागील काही दिवसांपासून शहर स्वच्छतेसाठी पाऊले उचलली आहेत. याच्या तपासणीसाठीच केंद्रीय समिती बीडमध्ये आली आहे. दोन दिवस कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर बुधवारी समितीने शहरातील काही ठराविक परिसरांची पाहणी केली. पेठबीड, मित्रनगर आदी निवासी परिसरांची पाहणी केली. त्यानंतर सुभाष रोड, महात्मा फुले भाजी मार्केट, बलभीम चौक या व्यापारपेठेची तपासणी केली.

सायंकाळच्या सुमारास कनकालेश्वर विद्यालय, सेंट अ‍ॅन्स स्कूल, संस्कार विद्यालयाला भेट देऊन या शाळांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदविला की नाही, याची माहिती घेतली. या सर्व शाळांनी सहभाग नोंदवून पालिकेला सहकार्य केल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांच्याकडून पूर्ण शहराची माहिती समितीने घेतली. यावेळी डॉ. जावळीकर यांच्यासह श्रद्धा गर्जे, स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, आर.एस. जोगदंड, भागवत जाधव, सुनील काळकुटे, भारत चांदणे, रमेश डहाळे आदींची उपस्थिती होती.गुणांसाठी धडपडकेंद्रीय समितीपुढे आपण कुठे कमी पडणार नाही, आपल्या चुकीमुळे एक गुण कमी होणार नाही, याची पूर्ण खबरदारी नगरपालिका अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. समितीकडून शहर तपासणीचा आढावा आॅनलाईन पोहचविला जात होता.